मुंबई: धारावी विधानसभा मतदारसंघात एकाच दिवशी 24 अर्ज दाखल केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Maharashtra Samachar••1 व्ह्यूज•1 मिनिट वाचा
बृहन्मुंबई महानगरपालिका मतदार यादीच्या विशेष सखोल आढावा कार्यक्रमांतर्गत (एसआयआर -2026) एकाच दिवशी 24 अर्ज दाखल केल्याबद्दल धारावी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
१७८ धारावी विधानसभा मतदारसंघातील गिरीधारी स्वामीनाथ जयस्वाल यांनी एकाच दिवशी २४ अर्ज दाखल केले. भारतीय निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या सूचनेनुसार नमुना -7 चे दररोज 10 अर्ज भरण्याची कमाल मर्यादा विहित केलेली आहे. महानगरपालिकेच्या म्हणण्यानुसार विहित मर्यादेपेक्षा जास्त अर्ज दाखल करणे हे नियमांचे उल्लंघन आहे. या संदर्भात लोकप्रतिनिधी कायदा, १९५० [...]