मुंबईतील सीएसएमटी रेल्वे स्थानकातून अपहरण झालेली एक वर्षाची मुलगी दिव्या येथून २४ तासांच्या आत रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतली. या प्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली होती, तर चोरीच्या गुन्ह्यात तिचे नावही समोर आले होते.
म. टा. प्रतिनिधी, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून अपहरण करण्यात आलेल्या एका अल्पवयीन मुलीची रेल्वे पोलिसांनी २४ तासांत सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी मुलीचा शोध घेतला.
बाळाला घेऊन झोपणाऱ्या महिलेला अटक
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, 15 ऑक्टोबर 2026 रोजी तक्रारदाराने ...