सीपीडब्ल्यूडी मुंबई येथे 'स्वच्छता ही सेवा' कार्यक्रमाचे आयोजन
Maharashtra Samachar••4 व्ह्यूज•1 मिनिट वाचा
मुंबई: संपूर्ण भारतभर स्वच्छ भारत अभियान राबवण्यात येत आहे.
स्वच्छ पर्यावरणाबद्दल जनजागृती करण्यासाठी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग (सीपीडब्ल्यूडी), मुंबई (चतुर्थ) यांनी हा “स्वच्छता ही सेवा” कार्यक्रम आयोजित केला आहे. भारत सरकारच्या संदेशाच्या अनुषंगाने प्रत्येक परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सीपीडब्ल्यूडी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. गृह कल्याण केंद्र सेक्टर -1, अँटोफिल, मुंबई येथील सर्व शिक्षक आणि कर्मचार्यांनी या कार्यक्रमात भाग घेतला आणि सीसी इमारत संकुलाची साफसफाई केली. याप्रसंगी सीपीएमचे पदाधिकारीही उपस्थित होते. तसेच औषधी वनस्पती "अल्बेला" आणि "तुळशी" लावले. CPWD...