मजकुराकडे जा
Maharashtra Samachar
मुंबई

हाजी इस्माईल हबीब मुसाफिरखाना मशिदीबाबत मोठी बातमी!

मुंबईतील भेंडी बाजार येथील हाजी इस्माईल हबीब मुसाफिरखाना मशिदीबाबत मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

Akbar KhanMaharashtra Samachar
1 मिनिट वाचा

मुंबई उच्च न्यायालयाने मशिदीच्या प्रेअर हॉलवरील (नमाज पठणाची जागा) सुरू असलेल्या पाडकामाच्या कारवाईला सध्या स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, सद्यस्थिती जैसे थे ठेवली जाईल.

या प्रकरणी २०२० मधील मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आणि पालिकेच्या (BMC) कारवाईबाबत कायदेशीर विवाद सुरू आहे.

सध्या मशिदीचा प्रेअर हॉल कायम ठेवण्यास सांगण्यात आले आहे. तथापि, या प्रकरणी अंतिम निर्णय येणे अद्याप बाकी आहे.

इतर भाषेत: हिन्दी

शेअर करा:

Akbar Khan

अनुभवी पत्रकार आणि लेखक