देशाच्या बौद्धिक आणि नैतिक पाया मजबूत करण्यासाठी शिक्षकांची भूमिका
Maharashtra Samachar••1 व्ह्यूज•1 मिनिट वाचा
महापौर रितू तावडे
आदर्श शिक्षण महापौर पुरस्कार सोहळ्यात 50 उत्कृष्ट शिक्षकांचा सत्कार
पुढील वर्षापासून आदर्श शिक्षक पुरस्काराची रक्कम 11 हजारांवरून 25 हजार रुपये करण्यात येणार आहे.
महापौरांची घोषणा मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवणाऱ्या शिक्षकांचा सत्कार मुंबई, 24 ऑक्टोबर 2026. देशाच्या भावी पिढीला आकार देण्यात शिक्षकांचे योगदान अमूल्य आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासामध्ये तसेच त्यांच्यात नैतिक मूल्ये रुजविण्यात शिक्षकांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. राष्ट्र उभारणीत आणि पिढी निर्माणात योगदान देणाऱ्या 50 प्रतिभावान शिक्षकांना आदर्श शिक्षण महापौर पुरस्काराने सन्मानित करताना मला आनंद होत आहे.