मजकुराकडे जा
Maharashtra Samachar
मुंबई

घाटकोपरमधील २१ मजली इमारतीला लागली आग

महापौर ऋतू तावडे यांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्याचा घेतला आढावा मुंबई / अकबर खान

Akbar KhanMaharashtra Samachar
1 मिनिट वाचा

मुंबई |

घाटकोपर (पूर्व) येथील वल्लभ बाग परिसरात शुक्रवारी रात्री 'रॉयल अल्टेझा' (Royal Altezza) या २१ मजली निवासी इमारतीच्या २० व्या मजल्यावर भीषण आग लागल्याने खळबळ उडाली. अग्निशामक दलाने या आगीला लेव्हल-२ ची आग घोषित केले. तथापि, अग्निशामक दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबईच्या महापौर श्रीमती ऋतू तावडे तात्काळ घटनास्थळी पोहोचल्या आणि बचाव व मदतकार्याचा आढावा घेतला. या दरम्यान त्यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून मदतकार्याची माहिती घेतली.

घटनास्थळी स्थानिक आमदार पराग शाह, नगरसेवक सुरेश आवळे आणि नगरसेवक धर्मेश गिरी हेदेखील उपस्थित होते.

मुंबई अग्निशामक दलानुसार आग सध्या नियंत्रणात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली आहे. मुंबई अग्निशामक दल, मुंबई पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि पालिकेच्या स्थानिक वॉर्ड कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य राबवले.

इमारतीत कोणी अडकले तर नाही ना, याचा शोध घेण्यासाठी अग्निशामक दलाकडून सखोल शोधमोहीम राबवली जात आहे.

सध्या आग लागण्याचे कारण समजू शकलेले नाही. अग्निशामक दलाकडून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे.

इतर भाषेत: हिन्दी

शेअर करा:

Akbar Khan

अनुभवी पत्रकार आणि लेखक